महाराष्ट्र रेंजर

आमच्याबद्दल

महाराष्ट्र रेंजर बद्दल

वन, वन्यजीव आणि पर्यावरणासाठी समर्पित प्रकाशन

8e0bddcd-feb4-4b2a-b678-c45542854f5f

“महाराष्ट्र रेंजर” हे महाराष्ट्रातील पर्यावरण, वन आणि वन्यजीव संवर्धनासाठी कार्यरत असलेले एक प्रभावी आणि जनजागृतीपर मासिक आहे. राज्यातील वनसंपदा, जैवविविधता, पर्यावरणीय प्रश्न, वन्यजीव संरक्षण आणि संवर्धन याबाबत समाजामध्ये जागरूकता निर्माण करण्याच्या उद्देशाने या मासिकाची निर्मिती करण्यात आली आहे.
महाराष्ट्र राज्य हे पर्यावरणाच्या दृष्टीने अत्यंत संवेदनशील राज्य असून येथे वन विभागांतर्गत प्रादेशिक वन, सामाजिक वनीकरण, वन्यजीव तसेच संशोधन व तत्सम शाखांमार्फत वन आणि वन्यजीव संवर्धनाचे मोठे कार्य केले जाते. राज्यातील विविध वनक्षेत्रांमध्ये जैवविविधतेची मोठी संपत्ती असून प्रत्येक क्षेत्राच्या समस्या, बलस्थाने आणि उपाययोजना या वेगवेगळ्या स्वरूपाच्या आहेत.
आजच्या काळात जागतिक तापमानवाढ, पर्यावरणीय बदल, प्रदूषण आणि इतर मानव निर्मित समस्यांचा मोठा प्रभाव पर्यावरणावर पडत आहे. या समस्यांवर सामूहिक प्रयत्नांतून मात करण्याची गरज ओळखून “महाराष्ट्र रेंजर” हे मासिक पर्यावरण, वन आणि वन्यजीव विषयक विविध घडामोडी, समस्या आणि त्यावरील उपाय समाजापर्यंत पोहोचवण्याचे महत्त्वपूर्ण कार्य करीत आहे.

आमची उद्दिष्टे

महाराष्ट्रात पर्यावरण, वन आणि वन्यजीव या विषयावर सर्वसमावेशक जागृकता आणि प्रचार प्रसिद्धी बाबतचे कार्य करणे.

महाराष्ट्रातील वन विभाग अंतर्गत राज्यस्तरावर आणि सर्व वन वृत्तात चालू असलेल्या विविध विकास कामांची प्रचार – प्रसिद्धी करणे.

क्षेत्रीय वन अधिकारी आणि कर्मचारी तसेच विविध वन संघटना आणि पर्यावरण संवर्धन कामी कार्य करणाऱ्या खाजगी संस्था यांच्यासाठी व्यासपीठ उपलब्ध करून देणे.

वनसेवेतून अनुभवाची शिदोरी घेऊन सेवानिवृत्त झालेल्या ज्येष्ठ वनाधिकाऱ्यांना आपले अनुभव कथन करण्यास मंच उपलब्ध करून देणे जेणेकरून येणाऱ्या नव्या वनपिढीस फायदा होईल.

प्रकाशनाची रचना

वन आणि वन्यजीव संवर्धन- संरक्षण व्यवस्थापन

वृक्ष लागवड आणि वृक्षतोड विषय

वन आणि वन्यजीव गुन्हे

वनातील मृद आणि जल संवर्धन

अवैध वृक्षतोड, अवैध शिकार, वन वणवा, वन्यजीव तस्करी

मानव-वन्यजीव संघर्ष, वन्यजीव बचाव पथक आणि रेस्क्यू

अधिवास विकास अंतर्गत कुरण विकास, अवाढ वनस्पती निर्मूलन

वन आणि वन्यजीव विषयक कायदे, नियम आणि शासन निर्णय

वन पर्यटन, वन्यजीव मंत्री, नियम, कार्यपद्धती आणि वन पर्यटन

पर्यावरण विषयक विविध विषय: पर्यावरणीय बदल, प्रदूषण इत्यादी

वनवृत्त साप्ताहिक घडामोडी

महाराष्ट्र राज्यातील वन विभागांतर्गत अरण्यात घडणाऱ्या विविध घडामोडींचे विवेचन

जंगल हिरोज

वन आणि वन्यजीव क्षेत्रात बहुमूल्य योगदान देणाऱ्या विविध व्यक्ती, आस्थापने आणि खाजगी संस्था यांच्या कार्याची माहिती.

खाजगी संस्था व्यासपीठ

पर्यावरण संवर्धन कामी कार्य करणाऱ्या विविध खाजगी संस्था यांच्या कार्याची थोडक्यात प्रसिद्धी

क्षेत्रीय अधिकारी-कर्मचारी व्यासपीठ

क्षेत्रीय अधिकारी आणि कर्मचारी तसेच संघटना यांना व्यासपीठ

जंगल क्लिक

प्रसिद्ध छायाचित्रकार, वन अधिकारी-कर्मचारी, स्थानिक लोक आणि पर्यटक यांच्या मार्फत टिपण्यात आलेली विविध छायाचित्रे प्रसिद्ध करणे.

सुरक्षित क्षेत्र

व्याघ्र प्रकल्प, हत्ती प्रकल्प, राष्ट्रीय उद्यान, वन्यजीव अभयारण्य, देवस्थाने, संवर्धन राखीव क्षेत्र आणि समुदाय राखीव क्षेत्र.

जैवविविधता विशेष

महाराष्ट्रातील जंगलात आढळणारे वनस्पती, झुडपे आणि वेली प्रजाती, गवत प्रजाती, वन्यप्राणी, पक्षी प्रजाती, सरीसृप प्रजाती, फुलपाखरे आणि कीटक आणि इतर सर्व जैवविविधता.

Untitled design - 2026-06-02T125758.425

संपादकीय भूमिका

महाराष्ट्र रेंजर हे मासिक राज्याचे पर्यावरणीय धोरण ठरवणारे सर्व मा. पदाधिकारी, मा. मंत्री महोदय तसेच नागपूर स्थित वनभवनाच्या मा. प्रधान मुख्य वनसंरक्षक (वनबल प्रमुख) यांचे कार्यालय आणि त्या कार्यालयातील सर्व अधिकारी वर्ग, राज्यातील सर्व संबंधित अधिकारी, विभागीय वन अधिकारी, वन परिक्षेत्र अधिकारी यांच्या कार्यालयात आणि राज्यातील सर्व क्षेत्राला पर्यावरण विषयक साप्ताहिक/मासिके संस्था व निसर्ग प्रेमी यांची पत्रे प्रत्यक्ष अंकाच्या ठिकाणी (हार्ड कॉपी) आणि ई-पत्रकांच्या माध्यमातून पोहोचवले जात आहेत. वाचकांचा वाढता प्रतिसाद पाहता महाराष्ट्र रेंजर हे मासिक भविष्यात इतर राज्यात हिंदी व इंग्रजी भाषेत प्रकाशित करण्याच्या टप्प्यावर मंडळाचा मानस आहे. तसे आपणापर्यंतच्या माध्यमातून मासिक क्षेत्रात महाराष्ट्र रेंजर मध्ये आपल्या कार्यक्षेत्रातील घडामोडी, तसेच विविध विषयांवरील माहिती आणि जाहिराती प्रसिद्ध करण्यात आम्ही उत्सुक आहोत, जेणेकरून वन आणि वन्यजीव विषयक प्रत्येक माहिती ही राज्याच्या कानाकोपऱ्यात पोहोचण्यास मदत होईल.
संपादकीय मंडळ,
महाराष्ट्र रेंजर

संपादकीय मंडळ

श्री किशोर अ. मिश्रिकोटकर

( वन अधिकारी )

श्री अजय म. पिल्लारीसेट

( निवृत्त विभागीय वन अधिकारी )

श्री. राहुल शिवाजीराव ताटे

( कार्यकारी संपादक – महाराष्ट्र रेंजर )

निसर्ग संवर्धनाच्या या प्रवासात सहभागी व्हा

वन, वन्यजीव आणि पर्यावरण विषयांवरील माहितीपूर्ण प्रकाशने व उपक्रमांसाठी आजच महाराष्ट्र रेंजरशी संपर्क साधा.